Friday, April 9, 2010

कॉलेजला जाताना


कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..
त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलाण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली

शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली...".................

का ग तु अशी वागतेस

तुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.
तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.
तुझ्या बरोबर जगलेले दिवस,
आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का तु अशी वागतेस ..

तुला पाहिलं कि स्वतःला विसरतो,
तुला पाहिलं कि स्वतःला हरवतो,
तुला पाहिलं कि जगच ठेंगन वाटत.
तु प्रत्येक गोष्ट किति सहजतेने समजुन घेतेस .
मग अलगद विचारावसं वाटत ,
का तु अशी वागतेस .

तुला खुप जाणावस वाटत,
तुला खुप ऒळ्खावस वाटत,
सारख तुझ्या सानिध्यात रहावस वाटत.
सर्वात मिसळून जाण्याचि तुझि ति अदा.........
मग अलगद विचारावसं वाटत ,
का तु अशी वागतेस .

तुझा तो अबोलेपणा, निरागसते चा प्रितिपणा,
मला तुझ वेड लाउन जात.... वेड....
आनंद व्यक्त करणारि तुझी अदा,
जगण्याला महत्व देउन जाते.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का तु अशी वागतेस .

तुझ हसणं, तुझ रुसण,
माझ्या आयुष्याला जणू ऊद्देश देउन जातं.
आयुष्यात जणू तुझीच गरज होती,
अस्सं वाटायला लागतं
तुझा विचार जरी मनात आला ना........
तरी गालावर एक गोड्सं हसु देउन जातं.
मग पुन्हा पुन्हा विचारवसं वाटत ....
का तु अशी वागतेस गं....
का तु अशी वागतेस गं....