Thursday, September 9, 2010

पाहिलं तुला ज्यादिवशी झालो तुझा दिवाना ............

पाहिलं तुला ज्यादिवशीझालो तुझा दिवाना,काय झाली माझी हालततुम्ही जरा पहा ना…!
काय झाला हो कहर,जेव्हा भिडली ही नजर !एक ह्रदय होते साधे,ते राहिले ना माझे…!!!
अचानक एके दिवशीआली ती मजपाशी,“होशील का मित्र माझा?”म्हणुनी लाजली जराशी
होकार देऊनी तिजलाआलो मी माझ्या घरला,न अन्न-पाणी काहीमी ध्यास तिचा धरला…!!!
होई मग रोज भेटीजिव माझा तिच्यात जडला,‘सांगू कसे तिला हे?’हा प्रश्न मला पडलाप्रितीच्या नावेला आताउफान मोठा चढला…!
सांगणार आज सगलेमी हे मग ठरविले,‘नाही’ म्हणेल म्हणुनीमनाने मज अडविले…
सोडुनी गेली जग हेकळले अचानक मजला,दिवा हा कसा रेइतक्यात असा विझला…
कळता क्षणीच माझ्याबसला मनास चटका,असा कसा अचानकझाला दगाफटका…
सांगणार होतो ‘प्रीती’हात घेउनी तुझा हाती,सांगेन म्हणता म्हणतासगलेच उरले बाकी….!

tuzach sanjay

No comments:

Post a Comment