Sunday, September 12, 2010

मॆत्री की प्रेम ?


मॆत्री म्हणाली प्रेमाला....
बघुयात तरी कोण उतरतयं खात्रीला ?

प्रेमाने पसरवली जादू.....
अल्लामंतर....कल्लामंतर....छूऊऊऊऊऊ.....

मंतरलेले डोळे .....
त्याला धुसरचं लागले दिसू
क्षणभर हासू.....
मात्र खात्रीचे आसू.

ठोके चुकलेले ह्रदय...
नि भुगा झालेला मेंदू
गणगोत दुरावले सारे....
स्वत:च स्वत:चा झाला शत्रु.

ख-या मॆत्रीची
मिळाली जेव्हा साथ...
ऊघड्ली अत्तराची कुपी
नि दरवळला अवघा आसमंत.

मॆत्रीची पडली ही अशी
नाजूकशी सरगाठ.....
कुठ्ल्याचं मतभेदाला आता
तिथे नसावी वाट.

प्रेमाने पत्करली
विनाशर्त शरणागती...
कळत-नकळत होते ते प्रेम
पण कधीचं न तूटणारी ती खरी मॆत्री !!!

No comments:

Post a Comment