Sunday, November 23, 2014

वेळ आली तर तुलाही सांगीन

वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
... मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं अस...


Motivational Quotes in Hindi

अजून हि आशा आहे तूझ्या परतून येण्याची

अजून हि आशा आहे तूझ्या परतून येण्याची
अमावशेच्या रात्रीमध्ये चांदणीच्या प्रकाशाची.
भिती वाटते मजला रखरखत्या सूर्याची
सोबत नसताना सावली तुझ्या छायेची.
अजून हि आशा आहे तूझ्या परतून येण्याची…
... पण मला वाटते तू परतून येणार नाही
पुनवेचे चांदण माझ्या अंगणी कधी फुलणार नाही
त्या दिवशी जाताना मागे वळून पहिलेच नाही
कठोर तुझ्या मनाला माझे प्रेम कळलच नाही
मी एक प्रेम वेडा तुझ्याच पाठमोऱ्या छायेकडे पाहत होतो
नजरेआड होता मृगजळात तुला शोधात होतो
हाती न येणाऱ्या मृगजळाच्या मागे मी जात होतो
मलाच माहित नाही मी कोणत्या वाटेवर चालत होतो
तुला शोधता शोधता मी इतका दूर निघून गेलो होतो
मागे वळून पहिले तर मी एकटाच राहिलो होतो
जाणिव झाली जेंव्हा मला एकटेपणाची
शिक्षा मिळाली मजला तुझ्यावरती केलेल्या प्रेमाची.
पण तरीही का वाटते तू परतून येशील
अमावशेच्या दिवशी अंगणी चांदण फुलवशील
जशी ओढ आहे चंद्राला चांदणीची
अजून हि आशा आहे तूझ्या परतून येण्याची…


Motivational Quotes in Hindi

नकळ्त जूळ्ले नाते तुझे नि माझे

नकळ्त जूळ्ले नाते तुझे नि माझे,
कसे ते उमगलेच नाही..........
आठवणींच्या हिन्दोळ्यातुन वाट काढीत ,
कधी सवय लागली तुझी, कळ्लेच नाही..........

तुला न पाहता, तुझी चाहुल मनाला लागत आहे......
अजुन एक क्षण, फक्त आठवन तुझी मी मागत आहे.....
कशी असशील तु, हे अजुनही मला ठाउक नाही,
पण सुंदर असाविस मोगऱ्यासारखी , यात तीळ्भर ही वाद नाही......

विचार करुनही मन थकले, कि सहवास
तुझा कधी लाभेल......
आयुष्य संपून जाईल कधितरी,
आणि आठ्वणी वर मला जगाव लागेल........

"आठवण"

न सांगता येणारी,
अन नकळतच जाणारी....

येताच डोळे भरून आणणारी,
अन जाताना,
चेहऱ्यावर हसू देऊन जाणारी..

ओळखा पाहू कोण ती?...

दिवस असो कि रात्र,
उन असो कि पाऊस,
वेळ-काळ काहीही न पाहता..

कधीही येणारी...
अन ती येताच...
एका वेगळ्याच विश्वात नेहणारी ...

ओळखा पाहू कोण ती?...

आयुष्भर साथ देणारी,
सगळे गेले सोडून,
तरीही ती न सोडणारी...

माझ्या सुरवाती पासून,
माझ्या अंतः पर्येंत,
माझ्याच बरोबर असणारी....

ओळखा पाहू कोण ती?...

ती....
ती म्हणजे "आठवण"
आयुष्भर साठवलेल्या सुरेल क्षणांची..

.... "आठवण"


Motivational Quotes in Hindi

एक होता चिमणा व एक होती चिमणी..

एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. एके
दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू
... मला सोडून,,उडून तरजाणार नाही ना?...
...तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर
तू मला पकडून घेशील... चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर
शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन
चिमण्याचे डोळे भरून आले.. त्याने आपले पंख छाटून
टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर
ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू... ... ... 

एके दिवशी जोराचे वादळ सुटले..
 चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत नव्हता.. चिमणीमात्र..
तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे
सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... 

चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मरून
पडला होता.. बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये..
फक्त एकदा..एकदाच जरतू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर
कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू
शकले नसते...
प्रेम हे असेच असते.....

श्रेयस (स्वप्निल) : तुला माहित होते
की माझे मरण निश्चित आहे तरीपण तु
माझ्याबरोबर लग्न केलेस. असे का केलेस
तु.......?
.
.
शिरिन ( सई) : मी विचार
केला की मी तुला काय देवू शकते तर
मला फक्त एकच उत्तर मिळाले
"मी फक्त तुझ्यावर प्रेम करु शकते"...!

किती छान होतं रे आपल नात. . . . .!!

किती छान होतं
रे आपल नात. . . . .!!
कोणास ठाऊक, कोणाची
नजर लागली आपल्या नात्याला. . . .??
उडून गेली ती स्वप्ने. . . .
संपला राजा राणी चा खेळ. . . . .
मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. . . . .
तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी. . . .
राहिले मी अधुरी. . . .

तू तिथे मी नक्की वाचा सर्वांनी..

तू तिथे मी नक्की वाचा सर्वांनी... आज मुलांच्या बाजुने, मुलींच्या मते सगळी मुलं, हि टपोरी फसवणारी, आणि खोटारडी .. पण सगळीच मुलं वाईट नसतात...!! मुलींना Hurt झालं, की त्या ढसाढसा रडतात, पण त्यांना काय माहित मुलं Hurt झाल्यावर, तोंडावर दु:ख न दाखवता कुठेतरी एकांतात नायतर रात्री अंथरुणात रडतात..... जिच्यावर प्रेम असतं, तिला सुखी ठेव रे देवा, अशीच देवाला प्राथना करतात..... पण मुलींना मात्र मुलं वाईटच दिसतात...!! प्रेयसीच्या समोर शान वाढावी म्हणुन, किती झोल करतात, मात्र तिने धोका दिल्यावर, मित्रांकडुन घेतलेलं उसणंचफेडत असतात..... आईबापापेक्षा जास्त, आपल्या Gf च ऐकतात, आणी मुलींना वाटतं मुलं वाईट असतात...!! जिवापाड प्रेम करतात, आणी काहिही करायला तयार असतात, पण साला कायतरी चुक काढुन, सगळा आत्मविश्वासंच संपवतात..... स्वतः निट अभ्यास करुन, चांगले गुण मिळवतात, पण मी फक्त टाईमपास करत होते आसं म्हणुन, त्याच्या अभ्यासाची वाट लावतात..... कारण त्यांना वाटतं, सगळी मुलं सारखीच असतात...!! मुलीच लग्न करायला घेतल्यावर, Bf ला नकार देऊन सगळा दोष त्यालाच देतात, पण त्यांना काय माहित जिच्यासोबत लग्न करणार आहोत, तीला खुश ठेवण्यासाठि किती धडपडत असतात..... आणी त्यांना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात...!! आयुष्याची राखरांगोळी करुन जेव्हा, त्या मुली जातात तेव्हा, तिची बदनामी होवु नये म्हणुन, सगळं मुकाट्याने सहन करतात..... आणि त्यांना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात...!! ती गेली त जाउ दे दुसरी शोधु, असं फक्त मित्रांच्या तोंडावर म्हणतात, पण एकांतात बसुन तिच्या आठवणीत रडतात, आणि कोणि पाहिल्यावर "काय नाय रे डोळ्यात कचरा गेला म्हणुन पाणि आलं" असं म्हणनारी मुलंच असतात..... आणी मुलींना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात..... खरंतर १०० मधुन, ७५ मुलं वाईट आसतात, पण या ७५ मुलांची वाट लावुन, त्यांना तसं वागायला मुलीच भाग पाडतात..... आणि त्यांना वाटतं, मुलं वाईट आसतात....!! कधीतरी मुलांच्या भावना, खरया मनाने समजून घ्या, कारण, हाताची पाची बोटं सारखी नसतात, आणि सगळीच मुलं वाईट नसतात.....

देवासमोर उभा होतो, हताश मी हात जोडून..

देवासमोर उभा होतो, हताश मी हात जोडून.. 
डोळ्यामध्ये पाणी होते, मनातून पूर्ण मोडून..
“देवा !” मी म्हणालो, “काय करू कळत नाही”...
“प्रश्नाच उत्तर मिळत नाही” “विश्वास ठेव” देव म्हणाला..
“देवा सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत” “विश्वास ठेव” देव म्हणाला.. 
देवा आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही
उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही तर कशावर मी विश्वास ठेवावा 
गामध्ये विश्वास आहे याचा तुझ्याकडे काय पुरावा ?
” शांतपणे हसत देव मला म्हणाला “पक्षी उडतो आकाशात, 
आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर”
“मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर”
“बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत, विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर”
“उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो, विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर”
“आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन, विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर” 
“असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात”
“आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीलेल नाही” “जिथवर तुझी दृष्टी आहे, त्याही पुढे सृष्टी आहे”
“तुझ्या बुद्धीच्यापलीकड ेही बऱ्याच गोष्टी घडत असतात आशेचे तुटलेले धागे तुझ्या नकळत जोडत असतात” 
“तुझ्या नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल” “म्हणून....सगळे रस्ते बंद होतील तेंव्हा फक्त ‘विश्वास ठेव’ जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो देव..!!!

Saturday, November 22, 2014

बघ माझी आठवण येते का ?

बघ माझी आठवण येते का ?

आता प्रत्येक तुझा क्षन माझ्या अस्तित्वापासून दूर असेल,
वर वर तू निश्चिंत असचील ........ पण मनात मात्र दुखाचा पूर असेल....
काही दिवसानंतर हा पूर ओसरेल,
कुठल्यातरी बेसावध क्षणी........... पुन्हा पाऊस बरसेल,
पुन्हा कुणीतरी आवडू लागेल........ पुन्हा डोळे झुरतील,
मनात मात्र तुझ्या ................. माझेच उसासे असतील.
वाट बघ... प्रेमाची भावना पुन्हा उफाळून येते का.....?
त्या क्षणी नकळत का होईना..........बघ माझी आठवण येते का.......?

कदाचित असही होईल....... तुला " स्थळ एखादं सांगून येईल ",
दोन्ही घरची बोलणी होतील....... दोन्हीकडून " होकार "असेल,
घरात जरी ' हो" म्हटलं तरी..... मनात तुझ्या " नकार" असेल,
पुन्हा मन दुबळ होईल..... स्वताचीच बाजू मांडायला,
अपयशी ठरला म्हणून 'वेडं'......तुझ्याशीस लागेल भांडायला,
भांडण मिटेपर्यंत... अंगावर हळद चढेल........
आपण नक्की काय करतोय ? तुझ्या मनाला कोड पडेल...
सनईच्या सुरावर... वाजंत्रीच्या तालावर नवीन घरात प्रवेश होईल.....
पायांना माप ओलांडताना मात्र मनाला क्लेश होईल.....
क्लेश होऊ देऊ नकोस..... असेल त्याचा स्वीकार कर,
" तूझ्यावर आता जबाबदारी आहे "याचा विचार कर...
अंगावरची हळद आता बघ हळूहळू उतरते का ?
पिवळ्या पाण्याकडे बघताना नकळत.......बघ माझी आठवण येते का....?

दिसा मागून दिस जातील...... वर्षा मागून वर्षे,
नव्या आयुष्यात पुन्हा......नवी नाती निर्माण होतील,
आपला नातं जरा जुनं होईल.... मनसुद्धा सुनं होईल,
माझ्या सुन्या मनात मात्र तूच राहशील..... तू सुद्धा एक दिवस माझ्यसारखीच झुरशील,

बघ एखादी पाऊलवाट तुला माझ्या आठवणीकडे न्हेते काय....?
सुकलेल्या झाडाला पुन्हा नव्याने एकदा पालवी फुटते काय...?
आयुष्याच्या अंतापर्यंत किमान " निखळ मैत्री" तरी उरते काय...?
आणि आयुष्यात एकदा तरी.....
बघ माझी आठवण येते का.......?

 

सांग ना परत येशील का ???

सांग ना तू परत येशील का ???

तुझ्या आठवणीत अडकलेले क्षण काही
पुन्हा नव्याने डोळ्यासमोर आले
पण तू मात्र अजून तिथेच का ???………

सांग ना तू हि परत येशील का ???

माझ्या डोळ्यांत पाहताना तू थोडासा घाबरला होतास
सर्वांची नजर चुकवून तू हळूच मला पाहत होतास
पण भेटशील जेव्हा पुन्हा सख्या
परत तीच झलक दाखवशील का ???….

सांग ना परत येशील का ???

तुझ्याशी बोलताना मनात चाललेले विचारांचे काहूर
फक्त तुझ्या स्मित हसण्याने गेले सगळे विचारायचे राहून
आता तरी त्यांची उत्तरे मिळतील का???….

सांग ना परत येशील का ???

आजही तुझ्या आठवणींचा गंध मनात दरवळतो आहे
जणू काही तो मला तुझ्या येण्याची चाहूल देतो आहे
प्रेमात तुझ्या चिंब होवून नाचावे
अखेरचे हे स्वप्न माझे आता पूर्ण करशील का??? …

सांग ना परत येशील का???

आपली माणसं परखी होतात तेव्हा...!!

आपली माणसं परखी होतात तेव्हा...!!

कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परखेच ठरतात.....

स्वतः करत राहतात चुका,
दोश मात्र दुस-यांना देतात.....
स्वतःच्या स्वार्थासाठी,
आपला वापर करतात.....

किती कठोर मनाची असतात माणसे,
दुस-यांच्या दुःखाचा आनंद साजरा करतात....
.
कितीही आपलं माना त्यांना,
शेवटी ते मतलबीच ठरतात.....
खोट्या प्रेमाचा आव आणुन,
दुस-यांच्या भावनेशी मनसोक्त खेळतात.....
अगोदर जिवाला जीव देण्याची भाषा करुन,
शेवटी आपला जीव घेऊन निघून जातात.....
कितीही कठोर असली तरी अशी माणसे,
आयुष्यात शेवटी नेहमी आठवत राहतात.....


माणसा रे माणसा... तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेंव्हा
मिठाई खावीशी वाटते
पैसे आल्यावर
मधुमेहा मुळे खाता येत नाही.

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते
पैसे आल्यावर
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते

माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
Nice Line....
इन्सान कहेता हे की पैसा आये तो
में कुछ करके दिखाऊ,
और
पैसा कहेता हे की तू कुछ करके दिखा तो में आऊ ।।

दिवस उजड़त गेला पण विचार काही संपले नाही .

दिवस उजड़त गेला पण विचार काही संपले नाही .
पक्ष्यांचा किलबिलत सुरु झाला पण
विचाराना शांतता लाभली नाही.
प्रत्येक सकाळी ठरवते विसरून जाईन तुला.
आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप नाही येत मला,
कधी हे सगले संपेल कधी ह्या मनाला शांतता मिळेल.
अस वाटत हे आता माझ्या श्वासाबरोबरच थांबेल,
डोळ्यातले अश्रु पुसायची हिम्मत होत नाही .
कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली.
दोष तुझा नाही माझा आहे,
तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे,
बहाने लाख मिळाले तुला विसरायचे पण त्याचा उपयोग
काही झालाच नाही ,
विसरून जायचे म्हंटले तरीही मन तयार होतच नाही,
राहिले आयुष्य तुझ्या आठवनींच्या नावावर,
खेळ खेळतेय आयुष्याचा शेवटच्या वाटेवर,
मी गेल्यानंतर तुही खुप रडशील.
मग माझ्या आठवनीत तुही तळमळशील.....



हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच...

हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच...

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाडप्रेम होते. त्याचं जरा जास्तच.तिच्यासाठी काय करु आणि काय नको असंत्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायमफ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताचromantic . तिच्याशिवायजगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असंत्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायचकाय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी नराहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंचप्रेझेण्ट केली.. ती खुषहोती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ारमोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यातती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यचहोता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुनदाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसतनव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले तेदोन जीव सुखात होते..... पण एक दिवससगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असंरडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखातठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तरकाहीच नाहि...मी परदेशी चाललेआहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तुमला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे..माझा- तुझा संबंध एकडेच संपला......."ती कायमची निघुन गेली... हा मॊडुनपडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपलेत्याच्यासाठी.. दिवस सरलेआणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुनसंतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्यानेठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलंना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा.इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटंदिसलं पाहिजे..’ पुढे.. या जिद्दीने पेटुनउठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्टकेले..राब राब राबला..मित्रांन ीमदतकेली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवसपालटले..तो खुप श्रींमतझाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर,चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन,प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेरपडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पणतरीही त्याच्या मनात चुटपुट कायमचहोती..ती सोडुन गेल्याची..तिनंनाकारल्याची..आप ल्या गरीबीचा अपमानकेल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्कारानेघेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशानगाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधारपाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेरपाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाचछत्रीत कुड्कुडत उभंहोतं..ं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणंअवघड झालं होतं.. त्यानेगाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ’ तिचेच’आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळगाडी थांबवली..त्यांन ा गाडीतबसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटतहोत..त्याच्या मनातली सुडाची आगजागी झाली होती..त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहूनत्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चातापव्हावा..असं त्याला मनोमन वाटतंहोत..तिला धडा शिकवण्याच्या..अ पमाना च्या घावांची परतफ़ेडकरण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हेत्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशानभुमीकडे थकल्या खाद्यांने चालतचराहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागेजातॊ. "..पाहतो आणि कोसळतोच.." तिचाचफ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आण कबरीजवळठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...हा सुन्न झाला...धावतचगेला कबरीकडे...तिच्य ा आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा.... तेम्हणाले..."ती परदेशी कधीचगेली नाही.तिला ' कर्करोग’झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडेदिवस होतएतिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःखतुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुनप्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुनउभा राहशील..जगशील.. यावर तिचा विश्वासहोता.., म्हणुन तिनं तुला सोडुनजाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तूजगलासं.

झिजत रहा, जळत रहा, तुमचा सुगंध पसरवत रहा..

अस म्हणतात की एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,आणी जास्त वापरली तर झिजते...

काहीही झाल तरी गंजून किंवा झिजून शेवट तर ठरलेलाच आहे..मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजण केव्हाही उत्तमच ना..??

मित्रांनो,
कळी उमलते , फूल बनते आपल्या संपूर्ण आयूष्यात फक्त सुगंध देते..

अगरबत्ती जळते, स्वतःला संपवते, ती ही आपल्या संपूर्ण आयूष्यात फक्त सुगंधच पसरवते..

चंदनाचे झाड, विषारी सापांच्या सहवासात वाढते, तरीही झिजून झिजून फक्त सुगंध आणी शितलताच देते..

तुम्हालाही तुमच आयूष्य अस सुगंधी बनवायच असेल तर इतरांसाठी झिजायला शिका..ते ही कसलीही अपेक्षा न करता..

लोक तुमचा फायदा घेतील, घेऊ द्या..
तुमचाच सुगंध आहे, सगळ्या जगभर पसरु द्या..

एकवेळ अशी नक्की येईल,जेव्हा देवघरातील देवही तेव्हा तुमच्या शिवाय अपुर्ण वाटतील, तोपर्यंत थांबू नका.. झिजत रहा, जळत रहा, तुमचा सुगंध पसरवत रहा..

दर्द दिलो के कम हो जाते .....में और तुम अगर हम हो जाते !!

दर्द दिलो के कम हो जाते .....में और तुम अगर हम हो जाते !!

तुझी आठवण आली की

तुझी आठवण आली की,

मला माझाचं खुप राग येतो..

संपले ना सर्व तुझ्याकडुन,

मग का असा स्वःताला त्रास देतो..

नको त्या खोट्या शपथा,

नको त्या सुखद आठवणी..

आठवुण सर्व काय करु,

मग डोळ्यात माझ्या येतं पाणी..

आठवणीँनी पाणावलेल्या डोळ्यांत,

तुला इतरांपासुन लपवू कसा..

भरभरुन वाहणाऱ्या अश्रुंना थोपवुन,

खोटे हसु आणू तरी कसा..

ते अश्रु लपवण्याच्या प्रयत्नांत,

मग मी तुलाचं दोष देत राहतो..

आणि या खोट्या प्रयत्नांत,

तुला आणखीनचं आठवत राहतो..