Sunday, September 12, 2010
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
मॆत्री की प्रेम ?
मॆत्री म्हणाली प्रेमाला....
बघुयात तरी कोण उतरतयं खात्रीला ?
प्रेमाने पसरवली जादू.....
अल्लामंतर....कल्लामंतर....छूऊऊऊऊऊ.....
मंतरलेले डोळे .....
त्याला धुसरचं लागले दिसू
क्षणभर हासू.....
मात्र खात्रीचे आसू.
ठोके चुकलेले ह्रदय...
नि भुगा झालेला मेंदू
गणगोत दुरावले सारे....
स्वत:च स्वत:चा झाला शत्रु.
ख-या मॆत्रीची
मिळाली जेव्हा साथ...
ऊघड्ली अत्तराची कुपी
नि दरवळला अवघा आसमंत.
मॆत्रीची पडली ही अशी
नाजूकशी सरगाठ.....
कुठ्ल्याचं मतभेदाला आता
तिथे नसावी वाट.
प्रेमाने पत्करली
विनाशर्त शरणागती...
कळत-नकळत होते ते प्रेम
पण कधीचं न तूटणारी ती खरी मॆत्री !!!
Friday, September 10, 2010
देवा तू चुकलास...
बघ माझी आठवण येते का ?
आता प्रत्येक तुझा क्षन माझ्या अस्तित्वापासून दूर असेल,
वर वर तू निश्चिंत असचील ........ पण मनात मात्र दुखाचा पूर असेल....
काही दिवसानंतर हा पूर ओसरेल,
कुठल्यातरी बेसावध क्षणी........... पुन्हा पाऊस बरसेल,
पुन्हा कुणीतरी आवडू लागेल........ पुन्हा डोळे झुरतील,
मनात मात्र तुझ्या ................. माझेच उसासे असतील.
वाट बघ... प्रेमाची भावना पुन्हा उफाळून येते का.....?
त्या क्षणी नकळत का होईना..........बघ माझी आठवण येते का.......?
कदाचित असही होईल....... तुला " स्थळ एखादं सांगून येईल ",
दोन्ही घरची बोलणी होतील....... दोन्हीकडून " होकार "असेल,
घरात जरी ' हो" म्हटलं तरी..... मनात तुझ्या " नकार" असेल,
पुन्हा मन दुबळ होईल..... स्वताचीच बाजू मांडायला,
अपयशी ठरला म्हणून 'वेडं'......तुझ्याशीस लागेल भांडायला,
भांडण मिटेपर्यंत... अंगावर हळद चढेल........
आपण नक्की काय करतोय ? तुझ्या मनाला कोड पडेल...
सनईच्या सुरावर... वाजंत्रीच्या तालावर नवीन घरात प्रवेश होईल.....
पायांना माप ओलांडताना मात्र मनाला क्लेश होईल.....
क्लेश होऊ देऊ नकोस..... असेल त्याचा स्वीकार कर,
" तूझ्यावर आता जबाबदारी आहे "याचा विचार कर...
अंगावरची हळद आता बघ हळूहळू उतरते का ?
पिवळ्या पाण्याकडे बघताना नकळत.......बघ माझी आठवण येते का....?
दिसा मागून दिस जातील...... वर्षा मागून वर्षे,
नव्या आयुष्यात पुन्हा......नवी नाती निर्माण होतील,
आपला नातं जरा जुनं होईल.... मनसुद्धा सुनं होईल,
माझ्या सुन्या मनात मात्र तूच राहशील..... तू सुद्धा एक दिवस माझ्यसारखीच झुरशील,
बघ एखादी पाऊलवाट तुला माझ्या आठवणीकडे न्हेते काय....?
सुकलेल्या झाडाला पुन्हा नव्याने एकदा पालवी फुटते काय...?
आयुष्याच्या अंतापर्यंत किमान " निखळ मैत्री" तरी उरते काय...?
आणि आयुष्यात एकदा तरी.....
बघ माझी आठवण येते का.......?
दगडाचा देव, दगडाचे भक्त
उपास-तापास, नवस आणि जागरणांचा ’सीझन’ आहे. जो तो देवाला खूश करायच्या मागे लागला आहे. कुणी बाबांच्या वाऱ्या करतात, तर कुणी दर्शनाचा अतिरेक करतात. उपासाच्या नावाखाली पोट फाटेस्तोवर उपासाचे पदार्थ खाल्ले जातात.
जागृत मानल्या जाणाऱ्या स्थळांवर मोठमोठे नवस मागितले जातात. अवडीच्या
गोष्टी सोडणे, मंदिरांना दान देणे, आठवड्यात एक चक्कर टाकणे हे सर्वही
त्याचबरोबर सुरू होते. या सर्वांचे कारण एकच - ’स्वार्थ’. काहीतरी हवे,
काहीतरी मिळावे म्हणून देवाला याप्रकारे मस्का मारला जातो. असेच
भिकाऱ्यासारखे हात पसरत माणूस सारखे काही ना काही मागत राहतो. गाडी, बंगला,
चांगली नोकरी... ही यादी संपत नाही. मात्र भीक मागण्यात आयुष्य संपून
जाते. आपले कुटुंब, ऑफिसमधील सहकारी, मुले, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक
यांच्या मनाचा, विचारांचा, गरजांचा विचार करायला वेळच उरत नाही. दगडासमोर
डोकं टेकण्यात तल्लीन झालेला मनुष्य जिवंत जीवांना विसरून जातो. अशाने देव
अजिबात खूश होत नाही. दुसऱ्यांची मने दुखवणाऱ्यांवर देव खूष होईल तरी कसा!
घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवासमोर उभे राहायला दोन मिनिटं नसणारे
लालबागच्या राजासमोर सात तास राम्ग लावतात. याला भक्ती म्हणत नाहीत. स्वामी
विवेकानंदांनी म्हटले तेचे खरे - मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे.
आपल्या अवतीभोवती असलेल्यांची मने सांभाळा, सर्वांशी प्रेमाने वागा, जगावर थोडा विश्वास ठेवा. ही खरी पूजा. चोर वाईट लोक भेटले की सगळेच वाईट दिसू लागतात. दोन दु:खद प्रसंग घडले की, नशीब खोटे वाटू लागते. नजर
जाईल तिथे खोटेपणा, लबाडी आणि त्रास पाहण्याची सवय होते. मनात कपट, द्वेष,
शंका आणि लबाडी ठेवून केलेली पूजा ही पूजा नसून वेडेपणाच आहे. स्वच्छ, शांत
आणि प्रेमळ मन हा भक्तीचा पाया, बाकी सगळे नंतर. इमारतीचा चाळीसावा माळा
कुणालाही भावेल, पण त्यासाठी पायाही मजबूत हवाच ना. पूजा,
उपास, नवस वगैरे आयुष्याच्या इमारतीतला चाळीसावा माळा आहे. अत्यंत देखणा
आहे, पण स्वशुद्धीचा पाया आधी नीट बाधुन घ्या. वाईटाने माखलेले मन घेऊन
कोणत्याही देवळात गेलात, कितीही उपास केलेत किंवा कोणताही नवस मागितलात तरी
पदरी निराशाच येणार. बनवणाऱ्याला चालवता येते, देवाकडे ’करप्शन’ हा प्रकार
चालत नाही. तिथे लाच देऊन चांगले आयुष्य घेता येत नाही. तिथे चालते फक्त
मनुष्यप्रेमाचे नाणे.
देवाने बनवलेल्या सृष्टिवर व त्याने आकारलेल्या मनुष्यावर
प्रेम करणाऱ्यांची इथे हुकुमत असते हे समजून घ्या.
देव दगडाचा जरी दिसत असला तरी दगडाचे भक्त बनू नका?
Thursday, September 9, 2010
पाहिलं तुला ज्यादिवशी झालो तुझा दिवाना ............
काय झाला हो कहर,जेव्हा भिडली ही नजर !एक ह्रदय होते साधे,ते राहिले ना माझे…!!!
अचानक एके दिवशीआली ती मजपाशी,“होशील का मित्र माझा?”म्हणुनी लाजली जराशी
होकार देऊनी तिजलाआलो मी माझ्या घरला,न अन्न-पाणी काहीमी ध्यास तिचा धरला…!!!
होई मग रोज भेटीजिव माझा तिच्यात जडला,‘सांगू कसे तिला हे?’हा प्रश्न मला पडलाप्रितीच्या नावेला आताउफान मोठा चढला…!
सांगणार आज सगलेमी हे मग ठरविले,‘नाही’ म्हणेल म्हणुनीमनाने मज अडविले…
सोडुनी गेली जग हेकळले अचानक मजला,दिवा हा कसा रेइतक्यात असा विझला…
कळता क्षणीच माझ्याबसला मनास चटका,असा कसा अचानकझाला दगाफटका…
सांगणार होतो ‘प्रीती’हात घेउनी तुझा हाती,सांगेन म्हणता म्हणतासगलेच उरले बाकी….!
tuzach sanjay