सत्य एक सांगून गेली, सत्य दुजे मनी दडवून गेली ……
मिलनाची चाहूल लागायच्या आधीच तुझी दिशा तू बदलली
अन मज हळव्या मनाला एकाकी कशी तू सोडून गेली……
गूढ तुझिया मनीचे न सांगताच, मज तू रडवून गेली ……
कधीकाळी तुजसाठी एक कविता मी होती लिहिली
पण काळजावर कोरले शब्द माझे, अलगद तू पुसून गेली ……
आता सरल्या कितीच रात्री, दिसहि कित्येक लोटली
पुन्हा आठवण तुझी अधुऱ्या त्या क्षणांत मज हरवून गेली ……
No comments:
Post a Comment