Sunday, February 2, 2014

नको मला सोबत तुझी....

नको मला सोबत तुझी,
जी मला,
रडवणार आहे.....
******************
नको मला तुझे ते फुल,
जे माझ्या,
देहावर वाहणार आहे.....
******************
नको मला तुझे ते अश्रू,
जे तू माझ्यासाठी,
गाळणार आहे.....
******************
नको मला प्रेमाचे कटू बोल तुझे,
जे मला नेहमी,
काट्यासारखे टोचणार आहे.....
******************
नको मला तुझा तो फसवा जिव्हाळा,
जो मला जिवंतपणी,
दररोज मारणार आहे.....
******************
दररोज मारणार आहे.....

No comments:

Post a Comment